सालेकसा ते दरेकसा मार्गावर हाजराफॉल गेट जवळ 22 सप्टेंबर रोजी एका अज्ञात वाहनाने युवकाला धडक दिली असता 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली फॅशन प्रो हीरो कंपनीची मोटरसायकल के एम पी 50 एम वी 1498 वरून आपले गावी शंभुटोला येथे जात असता यातील अज्ञात वाहन चालकाने धडक दिली व गंभीर दुखापत करून त्यास उपचार कामी दवाखान्यात न घेऊन जाता व अपघाताबाबत पोलिसांना कोणतीही सूचना न देता पळून गेला रोहित मलगम असे त्याचे नाव आहे