मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी लाडक्या भावांची राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ आज संविधान चौकात तब्बल पंचवीस हजार प्रशिक्षणार्थी लाडक्या भावांनी चक्काजाम आंदोलन केले. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण खुश केल्यानंतर लाडक्या भावांचे काय हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला तेव्हा लाडक्या भावाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचे घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.