बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाशदादा साळुंके हे दोन आमदार तातडीने मुंबईतील आझाद मैदान उपोषणस्थळी दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अगदी काही वेळातच दोन्ही आमदार तिथे पोहचले. त्यांनी यावेळी जरांगेशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली.