ऑनलाइन गेम च्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रकरण उघडकीस येत असताना त्याचबरोबर ऑनलाईन गेम मुळे लोकांचे मानसिक आरोग्य सुद्धा धोक्यात आलेले असताना या ऑनलाइन फसवणुकीच्या गेम वर आढा घालणे अत्यंत महत्त्वाचे होते, त्या अनुषंगाने लोकांचे हित लक्षात घेऊन व त्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी माननीय खासदार महोदयांनी दूरदृष्टी ठेवून अशा प्रकारचा कायदा करण्याची संसदेत मागणी केली होती.