हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्या पवित्र जन्मदिना निमित्त जश्ने ईद मिलादुन्नबी रक्तदान समिती, आर्णी यांच्या वतीने आज (दि. ४ सप्टेंबर) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला समाजातील सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल १५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. सामाजिक संस्था, राजकीय नेते, विविध अधिकारी-पदाधिकारी, पत्रकार बांधव, डॉक्टर्स असोसिएशन, व्यापारी संघटना तसेच इतर अनेक संघटनांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे क