धक्कादायक घटना : अंबड शहरात तोतया पोलिसांकडून निवृत्त मुख्याध्यापकाला लुटले.. अंबड शहरात भरदिवसा दोन तोतया पोलिसांनी निवृत्त मुख्याध्यापकाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भामट्यांनी तब्बल २ लाख २५ हजार रुपयांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मर्त्योदरी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक उत्तमराव विठ्ठलराव शिंदे (वय ७२) हे बुधवारी (दि. २०) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जालना रोड