पालघर जिल्ह्यातील जलसार परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बोगदाचे काम सुरू असून यामुळे करण्यात येणाऱ्या भाऊ सुरंग स्फोटामुळे परिसरातील घरांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जलसार येथील या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार विलास तरे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. नुकसानग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई व आगामी काळात अधिक नुकसान होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना, खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.