मतदार अधिकार यात्रे दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या शिवीगाळीवर शिवसेना ठाकरे प्रवक्ते आनंद दुबे यांनी आज गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, आई ही आई असते, मग ती राहुल गांधींची आई असो किंवा नरेंद्र मोदींची आई, कोणाच्याही आईचा कधीही अपमान होऊ नये.