पोळ्याच्या पाडव्याला शनिवारी वार्ड रामटेक च्या नवयुवक मारबत उत्सव मंडळाद्वारे शनिवार दिनांक 23 ऑगस्टला सकाळी अकरा वाजता पासून शनिवारी वार्ड रामटेक येथून मोठ्या उत्साहात काळी मारबत काढली. डी जे च्या तालावर थिरकत युवकांनी उत्साहात काढलेली ही मारबत मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत गांधी चौक रामटेक येथे पोहचली.. दुपारी एक वाजता टेलिफोन कार्यालय परिसरातील मैदानात या मारबतीचे दहन करण्यात आले.