आज मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी बाळासाहेब भवन मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखाली ४० चे ६० आमदार निवडून आले. उबाठाचे २० आमदार आले. पुढे ते ही आमच्याकडे येतील त्यांनतर उबाठाला कायमचा विसावा घ्यावा लागेल. राऊतांना पुन्हा राज्यसभेवर निवडून पाठवण्यासाठी उबाठाकडे संख्याबळ नसल्याने राऊत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला मतदान करतील की काय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे