मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी शासनाने ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई केवायसी केले नाही तर लाभ बंद होणार असल्याने लाडक्या बहिणी केवायसी करिता आपले सरकार केंद्रावर गर्दी करत आहे. परंतु ऑनलाईन पोर्टल स्लो झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील लाखोच्या संख्येत असलेल्या लाडक्या बहिणीच्या ई केवायसी प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. तांत्रिक अडचणीमुळे केवायसी होत नसल्याने महिलांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.