हिंगणघाट तालुक्यातील धांबा गावाजवळील छोट्या पुलाच्या खालील नाल्यात पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिस तपास सुरू आहे.