आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यापासून रूट मार्च काढण्यात आला होता. आज सायंकाळी हा रूट मार्च करण्यात आला. या रूट मार्च चे नेतृत्व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या रोड मार्च दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभाग पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.