निवडणूक आयोगावरील विरोधकांच्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने विधाने करत आहेत ते जनतेच्या हिताचे नाही. त्यांच्या शब्दांचा निवडणुकीतही काही फरक पडणार नाही.