जालना येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने बदनापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सतिष ढील्पे याला 300 रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले असून त्याच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती शनिवार दि.23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. सतिश शशिकांत ढिलपे बदनापूर पोलीस ठाण्यात सहायक पोलिस उप निरीक्षक नेमणूकीस आहे. त्याने जालना ते बदनापूर चालणार्या ऑटोरिक्षा चालकाला बदनापूरच्या श्रीराम जिनिंग समोर लाच मागीतली.