पालघर तालुक्यातील मनोर नांदगाव मार्गावर कार आणि दुचाकीचा विशाल अपघात घडला आहे. नानगावहून मनोरच्या दिशेने जात असतना समोरून आलेल्या भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघात भीषण होता की कार आणि दुचाकी दोनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.