जेसीबी विक्रीतून शेतकऱ्याची फसवणूक; घारगाव पोलिसांनी दोन जेसीबी ताब्यात घेतले संगमनेर तालुक्यातील बोटा येथील संतोष मुसळे या शेतकऱ्याची जेसीबी विक्री प्रकरणात मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. एजंट सुमित पिंगळे याने परस्पर जेसीबी विकल्याचा आरोप असून, घारगाव पोलिसांनी या प्रकरणी दोन जेसीबी ताब्यात घेतले आहेत. यातील एका जेसीबीची इंजिन नंबर प्लेट गायब असून चेसिसवरील प्रिंटेड नंबर मिटवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.