मुंबईतील खड्ड्यांबद्दल, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, मुंबईतील खड्ड्यांसाठी सध्याचे सरकार जबाबदार आहे. याला जबाबदार असलेले मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आहेत, कारण त्यांनी ही योजना मुंबईसाठी नाही तर कंत्राटदारांसाठी तयार केली आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली.