जावली तालुक्यातील कुडाळ विभागाला वरदान ठरणाऱ्या कुडाळी प्रकल्पातील महू व हातगेघर धरणाचे काम गेल्या ३० वर्षापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाचे व कालव्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.परंतु उर्वरित कामाबाबत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक दिरंगाई होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करून धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात लवकरात-लवकर पोहोचण्यासाठी प्रशासनाने अंतिम तारीख जाहीर करावी.