राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालयात आज बुधवारी दुपारी १ च्या सुमारास राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातील हिंगोली जिल्हा परिषदचे माजी सदस्य विलासराव रायवाडे यांच्या समवेत वसमत तालुक्यातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.