जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य माणसाचा फोन आला तर, पालकमंत्री तात्पर्यतेने त्याचे काम करतात, मग सातारा शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या कामासंदर्भात ते बोलू शकत नाहीत का, इथल्या प्रत्येक नागरिकाला सुविधा पुरविणे हे त्यांचे काम आहे, आणि या सुविधा होत नसतील तर पालकमंत्री आमच्या कामाचे नाही, असे चित्र दिसतंय असा आरोप उद्धवसेना कार्यकर्त्यांनी, आज राधिका रस्त्यावरील खड्ड्यांच्या आंदोलनाला संदर्भात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.