राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी शासन सेवेत समायोजनबाबत अद्याप निर्णय न झाल्याने गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. आज राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारसाठी प्रतिकात्मक जागरण गोंधळ घालण्यात आला. यावेळी काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून आंदोलनात सहभागी झाले होते. मागील सहा दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरु आहेत