कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे आज नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी रवी भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात सगळीकडे सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे . पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.