जालना तालुक्यातील कडवंची शिवारात एका लक्झरी ट्रॅव्हल्सला मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास भिषण अपघात झाला असून या अपघातात 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. पुण्याहून नागपूरकडे जाणारी लक्झरी ट्रॅव्हल्स गाडी क्र. बीआर 06 पीजी 5581 ही गाडी समृध्दी महामार्गाने धावत होती. गाडी ही पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील कडवंची शिवारात आली असता समोर उभा असलेल्या वाहनास धडकली. त्यामुळे झालेल्या भिषण अपघातात गाडीमधील 20 जण गंभीर जखमी झालेत.