कळमनुरी तालुक्यातील पेटवडगाव येथील प्रहरी सैनिक स्कूलमध्ये आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे उद्घाटन प्रसंगी आले असताना त्यांनी उद्घाटन झाल्यानंतर आपल्या शिवसेना कार्यकर्त्यासमवेत खो खो खेळत आनंद लुटला आहे .त्यांच्यासमवेत शिवसेना कार्यकर्त्यांची टीम सहभागी झाली होती .