धाराशिव बस स्थानकातील वाहनतळ जागेचा ताबा देण्यासाठी आणि कँटीनचे शटर बंद करण्यासाठी एका गुत्तेदाराकडून ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय स्थापत्य अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शशिकांत अरुण उबाळे (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या वर्ग-२ च्या अधिकाऱ्याचे नाव असून, ही कारवाई २२ जुलै ३ वाजता बस स्थानक परिसरात करण्यात आली.