जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक 6 जून रोजी सकाळी 11 वाजता पार पडला, यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकाची भगवी पताका असलेली गुढी उभारण्यात आली. महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले, या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषातील कलाकारांची शोभायात्रा काढण्यात आली.