आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सफाळे पोलीस ठाणे अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभा राऊळ, सफाळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दत्ता शेळके, शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. या बैठकीत गणेशोत्सव सलोख्याच्या वातावरणात सात साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे गणेशोत्सव वाचा पार्श्वभूमीवर विविध समस्या व प्रश्न यांबाबत चर्चा करण्यात आली.