बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातील पूर्णाकृती स्मारकस्थळी १ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आमदार संजय गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते विजय अंभोरे, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे आदी उपस्थित होते.