मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील मुंबई येथील आझाद मैदानावर शुक्रवारपासून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी आमदार अभिजीत पाटील मतदारसंघातील मराठा बांधवासह निघाले असून सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली आहे. ते आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.