नेपाळ फिरायला गेलेले पुण्याचे २३ नागरिक सध्या काठमांडूमध्ये अडकले असून, परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. भारताकडे येणारी विमानसेवा रद्द झाल्याने आणि नेपाळमध्ये लागू असलेल्या कर्फ्यूमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अडकलेल्या नागरिकांपैकी २१ जण ज्येष्ठ नागरिक आहेत. अन्न, औषधोपचार आणि इतर मूलभूत सोयी उपलब्ध नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.