इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.इंदापूर शहरात काल (दि. 16) या कुत्र्याने अंधाधुंद चावा घेत 17 हुन अधिक नागरिकांना जखमी केले. मोटारसायकलवरून जाणाऱ्या महिला आणि पुरुषालाही त्याने चावा घेतल्याची घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे.