महसूल सेवक कोतवाल पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने अखेर शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर सकाळी दहा वाजता पासून तहसील कार्यालय रामटेक समोर विदर्भ महसूल( कोतवाल )सेवक संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याआधी या मागणीकडे शेवटचं लक्ष वेधण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हे धरणे आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.