संग्रामपूर तालुक्यातील वरवट संग्रामपूर रस्त्या दरम्यान पांडव नदी जवळ 23 ऑगस्ट रोजी रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर व आयशर मध्ये अपघात होऊन एक जण ठार झाला होता.याप्रकरणी आयशर चालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी तामगाव पोलिसांनी 4 सप्टेंबर रोजी रिंगणवाडी येथील अजाबराव माणिकराव गव्हांदे याला अटक केल्याची माहिती 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.