वर्धा–नांदेड रेल्वे मार्गाच्या कामांदरम्यान दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून २० ऑगस्ट रोजी चार बालकांचा मृत्यू झाल्यानंतर तुटपुंजी मदत देऊन रेल्वे कंत्राटदारास वाचविण्याचा काही राजकीय नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्वरित रेल्वे कंत्राटदारावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने मंगळवारला सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.