हिंगोली आज दिनांक २९ ऑगस्ट बारा वाजता दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वहिनी सौ. ज्योती फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात दर्शन घेऊन गणरायाचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या या दौऱ्याचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.