आर्णी शहरासह तालुक्यात आज दिनांक 22 ऑगस्ट ला दुपारी पाच वाजता च्या दरम्यान मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोडीने सजवून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोडीला आणून उभे केले शहरातील मानाची बैल जोडी श्री भारती यांची असल्यामुळे त्यांची बैलगाडी आल्यानंतर त्यांची पूजा करून बैलपोळा फुटला यावेळी मोठ्या संख्येत आर्णी शहरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी हजेरी लावली होती