विटा शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. विटा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सांगली रोडकडे निघालेल्या दुचाकीला मुरमाने भरलेल्या डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील प्रमिला तांबे (वय ६२) या महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. दुचाकीवर एक नागरिक आपल्या बहिणीला घेऊन जात असताना चौकातून काही अंतरावर जाताच डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक