साकोली सेंदूरवाफा शहरांमध्ये साकोलीतील स्थानिक बेरोजगारांना रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय,दुकान टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने साकोलीतील विश्रामगृहात मंगळवार दि.12 ऑगस्टला रात्री आठ वाजता बैठकीचे आयोजन करून साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेची स्थापना करण्यात आली या बैठकीला साकोली सेंदूरवाफा येथील बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते