स्त्री पुरुष एकमेकांचे सहभागीदार आहेत. पुरुष ही स्त्रीला स्वयंपाकामध्ये मदत करू शकतात. परंतु बऱ्याचदा तशी संधी घरातील महिला त्यांना देत नाहीत. वास्तविक पाहता पती-पत्नी या दोघांनीही एकमेकांच्या सहकार्याने राहिला पाहिजे महिलांना देखील पुरुषाप्रमाणे समान संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने लिंग समानता प्रस्थापित होऊ शकते महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता, सक्षमीकरण आवश्यक असून या परिषदेत त्यावर विचार मंथन होत आहे.