वैतागवाडी या पेसा अंतर्गत येणाऱ्या गावात रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात 26 प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. स्थानिक महिलांनी शेतातून आणलेल्या भाज्यांपासून बनवलेले पदार्थ मांडले व स्टॉल्सद्वारे त्यांची चवही उपस्थितांना दिली. या उपक्रमातून रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म तसेच आदिवासींचे पारंपरिक ज्ञान याबद्दल माहिती मिळाली. कार्यक्रमाला वयम् चळवळीच्या सहसंस्थापिका दिपाली गोगटे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. 👉 या