पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी शस्त्र बाळगताना आढळून आला.महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेदांत मच्छिंद्र मेदगे (वय १९, रा, औदर ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२० ऑगस्ट रोजी) भामचंद्र डोंगराजवळ करण्यात आली.