भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करणारे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ मध्ये मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावले, असे बन यांनी म्हटले.