पेठ - मागील 12 तासापासून पेठ तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून पाऊस व वादळाने अनेक घरांचे नुकसान झाले असून संसार उघडयावर पडले आहेत.शनिवारी सायंकाळ पासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. काळूणे परिसरात वादळाने घरांचे नुकसान झाल्याने अनेक नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पावसात भिजून गेले. नद्या नाल्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून भात व नागली पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.