आज बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी प्रयत्न केले, असा आरोप कुलकर्णी यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा होती आणि त्यांनी ते दिले. मात्र, महायुतीच्या सरकारने आरक्षण दिल्यानंतर विरोधक त्याचे स्वागत करतील असे वाटले नव्हते.