कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये या नराधमाने सेल्फी काढला आणि परत येईल असे टाईप करुन ठेवले. बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीने कुरिअर बाँय असल्याचे सांगत सोसायटी मधे प्रवेश केला. महिलेने कुरिअर माझे नाही असे सांगितले, तरीही सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले. या प्रकारणी कोंढावा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.