मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील होतकरू युवकांना स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जाते. या योजनेतून 15 लाखापर्यंत कर्ज दिले जातात. विशेष म्हणजे या कर्जावर 4 लाख लाख 50 हजारापर्यंत परतावा करण्यात येतो.