महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिणचे दिवंगत जिल्हाध्यक्ष खेडकर यांच्या जन्मदिनी आज शुक्रवारी दुपारी खरवंडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला आपचे राज्य सचिव सुभाष केकाण, मनसेचे तालुकाध्यक्ष जिरेसाळ, शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवने, शहराध्यक्ष डांगे, शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे. आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील तरुणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.