अमेरिकेने भारतावर ५०% कर लादल्याबद्दल आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, या प्रकरणाचा निर्णय केंद्र सरकार घेईल, परंतु त्यामुळे सामान्य लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.