आज सावनेरमध्ये पारंपरिक बैलपोळ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांबरोबर या आनंदात सहभागी झालो आणि आपल्या जीवनाचे खरे साथीदार असलेल्या बैलांची पूजा केली. शेतकऱ्यांच्या उत्साहाने आणि श्रद्धेने भरलेले हे दृश्य मनाला भारावून गेले. शेतीची खरी ताकद म्हणजे आपले बैल आणि मेहनती शेतकरी. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आपल्याला नेहमी निसर्गाशी जोडून ठेवते. याचीच जाणीव ठेवून उत्कृष्टरीत्या सजावट केलेल्या बैलांच्या जोड्यांना मी स्वतः गौरवाने पारितोषिक